अध्यक्षपदावरुन दोन गटांमध्ये हाणामारी

October 26, 2010 10:32 AM0 commentsViews: 2

26 ऑक्टोबर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अल्पसंख्यांक विभागाच्या निवडीवरून औरंगाबाद शहरात दोन गटात हाणामारी झाली.

याप्रकरणी पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेश अध्यक्ष कदीर मौलाना यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

तर शहर अध्यक्ष मतीन खान यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांवरही प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे प्रकरण पक्षांतर्गत वादातून नाही तर प्लॉटच्या वादातून घडल्याचा कदीर मौलाना यांचा दावा आहे.

close