नाशिकमध्ये पोलिसाच्या घरावरच दरोडा

October 26, 2010 10:47 AM0 commentsViews: 1

26 ऑक्टोबर

नागरिकांना सुरक्षा देणारे पोलिसच, नाशिकमध्ये असुरक्षित आहेत. नाशिकमध्ये पोलिसांच्या घरात दरोडा घालण्याची हिंमत दरोडेखोरांनी केली आहे.

नाशिकमध्ये, डी वायएसपी घनश्याम पाटील यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला. या चोरीत तब्बल 3 लाखाचा ऐवज लंपास केला आहे.

दरोडा टाकल्यानंतर 6 दरोडेखोर फरार झाले. अंबड पोलिस स्टेशनच्या समोर सिंहस्त नगर मधली ही घटना आहे.

close