वेंकटेश्वर ग्रुपची आतंरराष्ट्रीय भरारी

October 26, 2010 11:28 AM0 commentsViews: 5

26 ऑक्टोबर

पुण्यातल्या वेंकटेश्वर हॅचरिज ग्रुपने ग्लोबल झेप घेतली आहे.

इंग्लिश प्रिमीअर लीगमध्ये खेळणारा ब्लॅकबर्न फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या दृष्टीने सध्या त्यांची बोलणी सुरु आहे.

ही बोलणी सफल झाल्यास इंग्लिश फुटबॉल क्लब विकत घेणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरेल.

येत्या नोव्हेंबरमध्ये याबाबतचा अंतिम करार होणार आहे. तब्बल अडीजशे ते तिनशे मिलीयन पाऊंड रकमेचा हा करार असणार आहे.

वेंकटेश्वर हॅचरिज ही कंपनी चिकन उत्पादन आणि फार्मास्युटीकल्समधली मोठी भारतीय कंपनी आहे.

close