काठोडा प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी सुनावणी 30 ऑक्टोबरला

October 26, 2010 11:36 AM0 commentsViews: 1

26 ऑक्टोबर

बीड जिल्ह्यातल्या काठोडा बलात्कार आणि दरोडा प्रकरणी दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवले आहे.

त्यांच्या शिक्षेची सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे. काठोडामध्ये 2008 साली एकनाथ तिष्टक यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता.

या दरोड्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारही करण्यात आला होता. तसेच एकनाथ तिष्टक यांची हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी दोघांना अटक झाली होती. गेल्या दीड वर्षांपासून, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरु होता.

close