सोलापूरात 63 पोलिसांना अन्नातून विषबाधा

October 26, 2010 11:48 AM0 commentsViews: 6

26 ऑक्टोबर

सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 63 पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली.

यापैकी 56 पोलिसांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तर 7 जणांना केगाव पोलिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी तूळजापूर इथला नवरात्रोस्तवाचा बंदोबस्त आटोपून हे प्रशिक्षणार्थी पोलिस केगाव इथे आले होते.

सकाळच्या नाश्त्यात दूध आणि चण्याची उसळ देण्यात आली होती.

यानंतर एक तासात पोलिसांना उलट्या आणि डोकेदुखी सुरु झाली.

या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

close