चॅम्पियन्स लीगचं नवं वेळापत्रक शुक्रवारपर्यंत ठरेल

December 11, 2008 4:42 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबर चॅम्पियन्स लीगचं नवं वेळापत्रक शुक्रवारर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. लीगच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक शुक्रवारी कॉन्फरन्स कॉलद्वारा होणार आहे. आणि त्यातच स्पर्धेच्या नव्या तारखा ठरतील. यापूर्वी 3 ते 10 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा भारतात होणार होती. पण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली होती. सीएनएन आयबीएनने दिलेल्या बातमीनुसार, चँपियन्स लीग जानेवारी महिन्यातच भरवण्यावर सध्या विचार सुरू आहे.आधी ठरल्याप्रमाणे पाकिस्तान चॅम्पियन्स आणि सियालकोट स्टॅलियन्स ह्या पाकिस्तानातल्या दोन टीम्स सहभागी होणार होत्या. पण आता दोन्ही देशांदरम्यानचे संबंध पुन्हा एकदा बिघडले आहेत. त्यामुळे हा मुद्दाही या बैठकीत चर्चेला असेल.

close