कोल्हापूरसाठी छप्पर फाडके निधी देऊ- मुख्यमंत्री

October 26, 2010 12:08 PM0 commentsViews: 5

26 ऑक्टोबर

कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही छप्पर फाडके निधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत दिले आहे.

यावेळी त्यांनी सेना – भाजप युतीवरही जोरदार टीका केली. युतीकडे आता कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ते धार्मिक मुद्दा पुढे करत लोकांची दिशाभूल करत आहे.

पण कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील आणि वनमंत्री पंतगराव कदम हे काँग्रेस पक्षाचे झंडू बाम आहेत.

त्यामुळे ते सर्वांना पुरुन उरतील अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

तर शिवसेनेवर निशाणा साधतांना, त्यांनी शिवसेनेला बालसेना म्हटले आहे.

close