रांगोळीने बाजारपेठ सजली

October 26, 2010 1:07 PM0 commentsViews: 65

26 ऑक्टोबर

दिवाळी आणि रांगोळी याचे अतूट नाते आहे. दिवाळीच्या खरेदीत रांगोळीचा नंबर सगळ्यात वर लागतो.

नागपूरच्याच नाही तर राज्यभरातल्या बाजारपेठेत सगळ्यांत जास्त मागणी आहे.

ती कोराडीच्या रांगोळीला कोराडीचे रंग ही इथली खासियत आहे.

रंगाशिवाय रांगोळीला कशी शोभा येणार? इतक्या आकर्षक रंगांपैकी कोणते रंग घ्यायचे असाच प्रश्न महिलांना पडतो.

नागपूरच्याकोराडीच्या रांगोळीची गोष्टच वेगळी आहे. दिवाळीमध्ये कोट्यवधींची उलाढाल या रांगोळी उद्योगातून होते.

काळ बदलतोय आणि दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीही तशाच रांगोळी काढण्याच्या पद्धती ही पण तरीही रांगोळीशिवाय घराच्या अंगणाची आणि दिवाळीची शोभा नाही हे खरंच आहे.

इकोफ्रेंडली कंदिल

दिवाळीनिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठा सध्या अशा विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी भरुन गेल्यात आहे.

मात्र, त्यातही नेहमीच्या कंदिलांपेक्षा इको फ्रेंडली कंदिलांचीच गर्दी अधिक दिसून येत आहे.

अशा प्रकारचे कंदिल घेतल्यामुळे त्यांचा वापर दिवाळीनंतरही होऊ शकतो असं ग्राहक सांगताहेत.

इकोफ्रेंडली कंदिल तयार करण्यासाठी कापड , ज्यूट , बांबू , चटई यांचा वापर केला जातो.

ठाण्यातल्या नौपाडा इथल्या या हेरंब आर्टस या दुकानामध्ये गेल्या 15 दिवसांपासून हे कारागीर आकाश कंदिल बनवण्याचे काम करत आहेत.

ग्राहकांच्या बदलत्या आवडी-निवडी कॅश करण्यासाठी कारागीरही सज्ज झाले आहे.

close