हक्क जगण्याचा

April 14, 2009 2:07 PM0 commentsViews: 5

आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 118 वी जयंती. या महामानवाने राज्यघटनेमध्येमानवी हक्कांसाठी काही तरतूदी केल्या आहेत. त्यानिमित्ताने आजच्या टॉक टाईमचा विषय होता 'हक्क जगण्याचा '… डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर दलितांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले.पण आजही अनेक दलितांना रोज जगण्यासाठी झगडावं लागतं. म्हणबनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आल्या होत्या जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा जोशी आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रविण मोरे.आंबेडकरांनी घटनेत दलित वर्गाच्या प्रगतीसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. पण अनेकांना आपल्या विकासासाठी केलेल्या या तरतुदींची माहितीच नसते.दलितांवर होणार्‍या अन्यायाबद्दल अनेक कायदे आहेत. पण त्याचा वापर केला जात नाही.दलितांना आरक्षण मिळालं म्हणून अनेकांना त्रास होतो. आपल्या वाट्याचं काहीतरी हिरावून घेत असल्याचं त्यांना वाटतं. पण आज अनेक दलित हालाखीचं जिणं जगत असल्याचं प्रतिमाताई म्हणाल्या. आपल्याला बर्‍याचदा असं दिसून येतं की काही ठिकाणी दलितांचं जगणं मरणापेक्षा भयंकर झालं आहे. याचंच उदाहरण म्हणजे एक ताजीतवानी खैरलांजीची घटना असं प्रविण यांनी सांगितलं. आंबेडकरांनीही आयुष्यात खूप काही सोसलं आहे. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संर्घष करा हा संदेश दिला असला तरी सरकारने दलितांची जगण्याची इच्छाच मारुन टाकल्याचं प्रतिमाताई खेदाने म्हणाल्या.

close