वाळू उपशावरील बंदी हायकोर्टाने उठवली

October 26, 2010 2:15 PM0 commentsViews:

26 ऑक्टोबर

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात असलेली वाळू उपशावरील बंदी आज हायकोर्टाने अखेर उठवली आहे.

राज्य सरकारच्या अध्यादेशमध्ये कोर्टाने काही बदल सुचविले आहेत.

वसुली अधिकर्‍यावर हल्ला करणाया कंत्राटदारावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे कोर्टाने सुचवले आहे.

तसेच, नदीच्या किनार्‍यापासून दोन मीटरच्या पुढे खोदाई नियमाचा भंग केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा असंही सांगण्यात आले आहे.

याशिवाय मायनींग आणि मिनरल ऍक्टनूसार दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.

कोर्टाच्या शिफारसी अमंलात आणू अस राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

close