शेअर मार्केट तेजीत सेफ आणि स्मार्ट गंतवणूक

April 15, 2009 1:20 PM0 commentsViews: 106

13 एप्रिल

गेला आठवडाभर शेअर मार्केटमध्ये तेजी होती. आठवड्याभराच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 4.5% उसळले. शेअरमार्केट पुन्हा वर आल्याने सामान्य गुंतवणूकदारांचंही लक्ष याकडे वळलं. अशा परिस्थितीत काय काळजी घ्यायला हवी, याविषयी या 'श्रीमंत व्हा'मध्ये माहिती दिली मार्केट तज्ज्ञ गणेश शानबाग यांनी.

शेअर मार्केटमधे सेफ आणि स्मार्ट गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी दिलेल्या या सूचना :- मार्केटच्या या तेजीत ट्रेडिंग करताना काळजी घ्या- तुम्हाला अंदाज असेल तरच इंट्रा डे ट्रेडिंग करा- यापूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून बाहेर पडण्याचा मोह टाळा – तुम्ही केलेली गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी असावी- एफएमसीजीसारख्या अनेक क्षेत्रातल्या कंपन्यांना मंदीचा अजूनही फारसा फटका बसलेला नाही याची नोंद घ्यावी.

close