पीटरसन आणि फ्लिंटॉफ आयपीएलमध्ये खेळणार

December 11, 2008 4:47 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबरइंग्लंड टीमचा कॅप्टन केविन पीटरसन आणि फास्ट बॉलर अँड्र्यू फ्लिंटॉफ यांना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. पण त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. इंग्लंडमधल्या स्थानिक स्पर्धेत पीटरसन हँपशायर तर फ्लिंटॉफ लँकेशायर या काऊंटीकडून खेळतात.या काऊंटींनी दोघांकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. इंग्लंडमधला क्रिकेट सिझन अर्धवट सोडून दोघांना आयपीएलसाठी भारतात यावं लागणार आहे. त्यामुळे दोन्ही काऊंटीनी या दोघा खेळाडूंकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. इंग्लंड बोर्डाने खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देतानाच संबंधित काऊंटीची लेखी परवानगी घेण्याची अट घातली आहे.

close