कृषी उत्पन्न बाजार समितीची तोडफोड

October 26, 2010 2:20 PM0 commentsViews: 2

26 ऑक्टोबर

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार शेतकर्‍यांनी तोडफोड केली. सोयाबीनला मिळणारा कमी दर आणि मार्केटमध्ये असलेल्या असुविधांना कंटाळून शेतकरी संतप्त झाले.

एपीएमसीच्या सभापती कार्यालयामध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे.

जाळपोळ करण्याचा प्रयत्नही शेतकर्‍यांनी केला. यावेळी शेतकर्‍यांनी पोलिसांच्या चार गाड्यांवर हल्ला केला आणि गाड्यांची तोडफोड केली.

याआधी रास्ता रोको, निवेदनं या माध्यमातून शेतकर्‍यांनी प्रश्न मांडला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या आदोलनाला हिंसक वळन प्राप्त झाले.

यावेळी रिपोर्टिंगसाठी गेलेले आमचे आयबीएन लोकमतचे रिपोर्टर मनोज जैस्वाल यांनाही यावेळी पोलिसांनी मारहाण केली.

त्यांचा कॅमेरा हिसकावला आणि 25 हजार रुपयेही हिसकावले. तहसीलदार आणि अधिकार्‍यांसमोर ही मारहाण झाली.

आता याप्रकरणी वाशिम- जिल्हा पोलिस अधिक्षक महादेव तावडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

close