पॉल ऑक्टोपस कालवश

October 26, 2010 2:35 PM0 commentsViews: 3

26 ऑक्टोबर

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2010च्या दरम्यान रातोरात स्टार झालेल्या पॉल ऑक्टोपसची भविष्यवाणी आता क्रीडाप्रेमींना पुन्हा ऐकायला मिळणार नाही.

पॉल ऑक्टोपसचा मृत्यू झाला आहे. जर्मनीच्या ऑबेरहॉसन मत्स्यसंग्रहालयाचे मॅनेजर स्टिफन पॉरवोल यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

पॉल ऑक्टोपस या मत्स्यसंग्रहालयात होता. फुटबॉल वर्ल्ड कप दरम्यान मॅचच्या निकालाचे अचुक भविष्य वर्तवणारा हा ऑक्टोपस एखाद्या फुटबॉल प्लेअरसारखाच स्टार झाला होता.

प्रत्येक मॅचपुर्वी हा ऑक्टोपस मॅचचा निकाल वर्तवत असत.

फिफा वर्ल्ड कप 2010 च्या आठ मॅचच्या निकालांची पॉलने अचूक भविष्यवाणी केली होती आणि त्यामुळे तो प्रत्येकवेळी चर्चेत राहीला होता.

सेमी फायनल तसेच फायनल मॅचचे भविष्यही त्याने अगदी अचुक वर्तवले होते. त्यामुळे वर्ल्ड कप पेक्षाही पॉल ऑक्टोपस प्रसिद्ध झाला होता.

close