अरुंधती रॉय आणि गिलानींवर देशद्रोहाचा खटला दाखल होणार नाही

October 26, 2010 4:34 PM0 commentsViews: 11

26 ऑक्टोबर

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी काश्मीर हा भारताचा भाग नाही, असं वक्तव्य केल्यामुळे अरुंधती वादात सापडल्या आहेत.

त्यांच्यावर याप्रकरणी देशद्रोहाचा खटला भरावा, अशी मागणी होत आहे. पण असा खटला होणार नाही, असे संकेत मिळत आहे.

गेल्या आठवड्यात राजधानी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात गीलानी आणि रॉय यांनी कथित भारतविरोधी वक्तव्य केली होती.

त्यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर या दोघांवर देशद्रोहाचे खटले दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पण काही वेळा पूर्वीच सरकारी सूत्रांनी सांगितलंय की असे खटले दाखल केल्यास, हा विषय चिघळून पूर्ण जगाचे लक्ष वेधले जाऊ शकते.

दरम्यान, देशद्राहाचा खटला दाखल होण्याच्या शक्यतेवर अरुंधती रॉय यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

अरुंधती रॉय म्हणता की, ज्या देशाला लेखकांची मुस्काटदाबी करावी लागते, त्या देशाची मला कीव येते.

अतिशय क्रूर लष्करी सरंजामशाहीत खंगणा-या काश्मिरी लोकांच्या न्यायासाठी मी बोलले होते.

या देशात धार्मिक द्वेष पसरवणारे, खूनी, भ्रष्ट, लुटेरे, बलात्कारी, गरिबांचे शोषण करणारे मुक्त फिरतात आणि जे न्यायासाठी लढा देतात, त्यांना मात्र कारागृहात डांबून ठेवले जाते.

close