गोध्रा प्रकरणी निकालाचा मार्ग मोकळा

October 26, 2010 4:37 PM0 commentsViews: 3

26 ऑक्टोबर

गुजरातमध्ये 2002साली घडलेली दंगल आणि साबरमती ट्रेन जळल्याप्रकरणी निकाल देण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा केला आहे.

पण गुलबर्ग सोसायटी मधल्या हत्यांकाडाच्या खटल्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

कोर्टाने गुजरात सरकारला गुलबर्ग केस प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

याआधी गुजरात सरकारने गुलबर्ग सोसायटी हत्यांकाडाची केस राज्याबाहेर सुनावणीसाठी पाठवावी, अशी मागणी करणारा अर्ज कोर्टाकडे केला होता.

त्यावर ही स्थगिती उठवायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. गुजरात दंगल प्रकरणातल्या 9 महत्वाच्या केसेसच्या निकालाला मे 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.

त्यापैकी 7 निकालांवरची स्थगिती आज उठवण्यात आलेली आहे.

close