पंढरपूरमध्ये राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेला सुरुवात

December 11, 2008 4:59 PM0 commentsViews: 10

11 डिसेंबर पंढरपूरसुनील उंबरेपंढरपूरमध्ये सातव्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पंढरपूरात आयोजित या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत 25 जिल्ह्यातील सुमारे 500 खेळाडू सहभागी झाले आहेत.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आयोजित या तिरंदाजी स्पर्धेला मिळालेला खेळाडूंचा प्रतिसाद पाहता स्पर्धा आयोजकांचाही उत्साह वाढला आहे. तिरंदाजी हा तसा महाराष्ट्रात दुर्लक्षित खेळ पण आजही खेडोपाड्यात या खेळानं आपलं अस्तित्व राखलं आहे. स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे संघटकही खूश आहेत. ऑलिम्पियन तिरंदाज रिना कुमारीला या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं होतं.तिरंदाजीच्या प्रसारासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा तिनं व्यक्त केली.सोलापूर जिल्हा तिरंदाजी संघटना आणि पंढरपूरच्या अजिंक्य क्रीडा मंडळानं या स्पर्धेचं संयुक्तपणे आयोजन केलं आहे. या स्पर्धेतील 72 खेळाडूंची अरुणाचल येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

close