‘त्रास ऍलर्जीचा’

April 21, 2009 3:20 PM0 commentsViews: 29

ऍलर्जी ही अलीकडे प्रत्येकाला होत असते मग ती अगदी त्वचेपासून परिक्षेपर्यंतची …एखादी गोष्ट आवडत नसेल तरी आपण म्हणतो की मला त्या गोष्टीची ऍलर्जी आहे…पण नक्की ऍलर्जी होते कशी, कशामुळे…हेच जाणून घेण्यासाठी आजचा टॉकटाईमचा विषय होता 'त्रास ऍलर्जीचा' आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते ऍलर्जी तज्ज्ञ डॉ. प्रमोद निफाडकर.

डॉ. निफाडकरांच्या मते, ऍलर्जी म्हणजे जी गोष्ट आपल्या शरीराला चालत नाही आशा गोष्टींमुळे होते. उदा. जर अंडं खाल्यामुळे त्रास होत असेल, एकदाच नाही प्रत्येक वेळेस, तर त्या व्यक्तीला अंड्याची ऍलर्जी असू शकते. हा त्रास उन्हामुळे, धुळीमुळे, चुकीचं खाण्यामुळे, वेगवेगळ्या पाण्यामुळे होऊ शकतो. औषधांचीही ऍलर्जी हल्ली दिसून येते. ताणामुळेही ऍलर्जी वाढू शकते आणि ऍलर्जीमुळे प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. यासाठी प्राणायम करणे, मॉइश्चराइजिंग करणे, वेळोवेळी ब्लड टेस्ट करुन चेक करणे, डोळे आणि कानांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच ऍलर्जीची काळजी घेणे, प्रामुख्याने स्तनपान अधिक वेळ चालू ठेवणे आवश्यक आहे असं डॉक्टर म्हणाले.

close