‘वारस छत्रपतींचे’

April 22, 2009 12:52 PM0 commentsViews: 391

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली उदयन राजे भोसले यांना… हे छत्रपतींच्या सातारा गादीचे 13 वे वारसदार. तर संभाजी राजे कोल्हापूरची गादी सांभाळत आहेत. लोकांच्या मनात या राजघराण्याबद्दल नेहमीच आदर असतो. त्यांना मानसन्मान मिळतो. त्याचा फायदा त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतही होऊ शकतो. ही दूरदृष्टी ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा मतदार संघातून उदयन राजे यांना तर कोल्हापूरमधून संभाजी राजे यांना निवडणुकीसाठी उभं केल आहे. खरं तर ज्येष्ठ काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांचा राजघराण्यांनी राजघराण्यात येऊ नये यासाठी तीव्र विरोध होता. पण याच यशवंतरावांचा राजकीय वारसा सांगणार्‍या शरद पवार यांनी मात्र मराठा राजकारणाची थेट नस पकडली आहे. आतापर्यंत उदयन राजे आणि संभाजी राजे यांची राजकीय कारकिर्द फारशी वाखणण्याजोगी नव्हती. त्यामुळे आता राजघराण्याच्या लोकप्रियतेचा फायदा या दोन्ही वारसदारांना कसा होईल, याचा वेध 'वारस छत्रपतींचे' या रिपोर्ताजमधे घेण्यात आला आहे. 'वारस छत्रपतींचे' हा रिपोर्ताज पाहण्यासाठी बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close