इलाज उष्माघातावर

April 27, 2009 5:56 PM0 commentsViews: 122

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि त्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळे आजारही दिसून येऊ लागले आहेत. असाच एक पण घातक आजार म्हणजे उष्माघात. या आजाराबद्दल जाणून घेण्यासाठी 27 एप्रिलच्या टॉक टाईमचा विषय होता ' इलाज उष्माघातावर '. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते फिजीशिअन डॉ. प्रकाश भडकमकर. आपल्या शरीराचं नॉर्मल तापमान 98.4 डिग्री सेल्सिअस असतं.जेव्हा वातावरणातील उष्णता खुप वाढते तेव्हा आपल्या शरीराचं तापमान स्थिर राखण्यासाठी आणि शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून आपल्याला घाम येतो. मात्र कोरडं हवामान असलेल्या भागात घाम येत नाही मात्र शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघात होऊ सकतो अशा भागांमध्ये रहाणार्‍या लोकांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. तापमान खूप वाढलं की हृदय, मेंदू, रक्तवाहिन्या, किडनी आणि यकृत यांच्या काम करण्याच्या पध्दतीत फरक पडायला लागतो. मळमळणं, हृद्याचे ठोके वाढणं, चक्कर येणं ही उष्माघाताची साधारणत: लक्षणं असल्याचं डॉ. भडकमकर यांनी सांगितलं.डॉ.भडकमकरांच्या मते भरपूर पाणी पिणं, मीठ जास्त खाणं, लिंबू सरबत पिणं, पन्ह पिणं, फलाहार करणं यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. तसंच ' इलेक्टोरल पॉवडर घेतली तरी चालेल. पण थंड पाणी प्यायचं असेल तर मडक्यातलं प्यावं फ्रिजमधल्या पाण्यानं घशाला गारवा मिळतो. पण तहान भागत नाही. उष्माघातचा झटका आल्यास रुग्णाला सावलीत न्यावं,शरीरावर पाण्याचा मारा करावा, पाणी पाजावं, बर्फाच्या पाण्यापेक्षा साधं पाणी वापरावं, असंही डॉ.भडकमकर म्हणाले. जर या आजाराची नीट काळजी घेतली नाही तर घातकी ठरू शकतो असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.उन्हाळ्यात हलका आहार घ्यावा,सैल,सुती आणि फिक्या रंगाचे कपडे वापरावेत असंही त्यांनी सांगितलं.

close