सागरी सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करू – मुख्यमंत्री

December 12, 2008 5:38 AM0 commentsViews: 4

12 डिसेंबर, मुंबईसागरी सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबवण्याची ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत चव्हाण यांनी ही माहीती दिली. सागरी सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करता याव्यात म्हणून , शॉर्ट टर्म इमिजिएट मेजर्स वापरण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी नियमांमध्येही शिथिलता आणण्याचीही त्यांनी तयारी दाखवली. "गस्त घालण्यासाठी जर स्पीड बोस्ट नसतील, तर आम्ही त्या तातडीनं भाड्यानं घेऊ. ज्या जागा भरायच्या आहेत, त्या जागी लवकरात लवकर नव्या कर्मचार्‍यांची नेमणूक करू, एमपीएससीच्या प्रक्रियेत त्याला चार महिने लागतात, पण आम्ही नियम शिथिल करून दोन महिन्यांच्या आत नवीन नेमणुका करू . इंटेलिजन्सला जी शस्त्र आणि सुविधा हव्यात, त्या पुरवल्या जातील. सुरक्षा काउन्सिल स्थापण्यासाठी आम्ही पावलं उचलली आहे. शस्त्रसज्ज आणि दक्ष पोलिसांचं आस्तित्व जाणवेल, याची आम्ही काळजी घेऊ" अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

close