डॉ. प्रकाश आणि मंदा आमटेंसोबत ग्रेट भ्रेट – 1

May 25, 2009 4:34 PM0 commentsViews: 112

ग्रेट भेटमध्ये पहायला मिळालं अनोखं जोडपं. ते अनोखं जोडपं होतं डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे. डॉ. अल्बर्ट श्वाईट्झशी नातं सांगणारं या दोघांचं काम आहे. हेमलकसामध्ये त्यांनी अद्भुत अनोखं विश्व निर्माण केलेलं आहे. डॉ. आमटेंच्या आतापर्यंत खूप मुलाखती झाल्या असतील… आतापर्यंत ते अनेकदा प्रकाशझोतात आले असतील… मात्र ग्रेटभेटमधून त्यांची जी मुलाखत घेतली तिचं कारण तसं खासचं होतं. आणि ते कारण म्हणजे डॉ. प्रकाश आमटेंनी लिहिलेलं आत्मचरित्र. मीतभाषी असणारे प्रकाश आमटे लिहू शकतात याचा प्रत्यय त्यांचं आत्मचरित्र वाचल्यावर येतो. तेव्हा ग्रेटभेटमधून सफर घडली ती प्रकाश आमटेंच्या आत्मचरित्राच्या प्रत्येक पानापानाची. त्यायोगे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटेंना बोलतं केलं.

close