पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर

November 9, 2010 1:55 PM0 commentsViews: 1

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू झाला. नवीन मुख्यमत्र्यांची घोषणा मुंबईतच होण्याची शक्यता आहे.

आज रात्रीच नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींच्या 10 जनपथ या निवासस्थानी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

ही बैठक हिवाळी अधिवेशनासंदर्भात असली तरी यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

प्रणव मुखर्जी आणि ए.के.अँटोनी हे दोघंही दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले आहे.

राष्ट्रवादीचा पाठिंबा

दरम्यान काँग्रेसनं मुख्यमंत्री म्हणून कोणाचंही नाव जाहीर केले तरी राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

close