उपमुख्यमंत्री बदलण्याचे संकेत

November 9, 2010 3:25 PM0 commentsViews: 1

09 नोव्हेंबर

काँग्रेसने मुख्यमंत्री बदलणार हे जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री बदलण्याचे संकेत दिले आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे.

त्यामध्ये जो निर्णय होईल, त्यानुसारच राष्ट्रवादीचा नेता ठरेल, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केले.

चारच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी असे विधान केले होते की, मुख्यमंत्री बदलला तरी आमच्याकडे काहीही बदल होणार नाहीत.

पण पवारांनी दिलेल्या या माहितीनंतर आता परिस्थिती बदललेली दिसते आहे. "उद्या कुणीही नेता निवडला जाऊ शकतो." असे त्यांनी आज मुंबईत सांगितले.

close