सर्वाधिकार सोनिया गांधींना

November 9, 2010 6:14 PM0 commentsViews: 1

09 नोव्हेंबर

राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीचे सर्वाधिकार काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींना देण्यात आले आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

पक्षाचे केंद्रीय निरीक्षक प्रणव मुखर्जी आणि ए.के.अँटोनी हे दिल्लीहून या बैठकीसाठी आले आहेत. पक्षाचा विधिमंडळ नेता निवडण्याचे अधिकार सोनियांना देण्याचा एका ओळीचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.

त्यामुळे आता सोनिया गांधी राज्याची मुख्यमंत्रीपदी कुणाची निवड करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतली नाव

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतली नावे आता बदलत चालली आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे या स्पर्धेत पुढे असले तरी यात आता सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचंही नाव आता चर्चेत आले आहे.

close