26/11 मागे दाऊदचा हात असल्याचा संशय

December 12, 2008 6:22 AM0 commentsViews: 6

12 डिसेंबर26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात लष्कर ए तोयबाबरोबरच अँडरवर्ल्ड डॉन दाऊदचाही हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतानं पाकला दाऊदला सोपवण्याची मागणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर दाऊदचा मॅनेजर म्हणून काम करीत असलेल्या मन्सूर अहमद याची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. मन्सूर अहमद दाऊद याच्या गँगच्या तेजीच्याकाळात दाऊदचा खास माणूस होता. दाऊदसोबत तेव्हा तोही दुबईत असायचा. गँगमध्ये मन्सूरचं मोठं वजन होतं. मुंबईत 12 मार्च 1993 साली केलेल्या बाँबस्फोटात दाऊदनं आपल्या साथीदारांना वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपवल्या होत्या. त्यात दाऊदनं अहमदवरही लॉजिस्टिक सपोर्ट ची जबाबदारी दिली होती. कटात सहभागी असलेल्यांची दुबईत राहण्याची व्यवस्था आणि विमानाची तिकीटं त्यांनं काढली होती. या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. त्याच्यावर टाडा लावण्यात आला होता. 5 ऑक्टोबर 2006 ला त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याबाबत आज मुंबई पोलिसांनी मन्सूर अहमदची चौकशी केली. त्याला दुपारी 4 वाजता सोडून देण्यात आलं

close