मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कराडमध्ये पुन्हा दिवाळी

November 10, 2010 8:32 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर

मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड झाल्यानंतर मिरजेत एकच जल्लोष पहायला मिळाला. मिरज ही नवनिर्वाचीत मुख्यमंत्र्यांची सासूरवाडी असून रामचंद्र घोरपडे हे त्यांचे सासरे आहेत.

कॉग्रेस कार्यकर्त्यांनी घोरपडेंच्या घरासमोर गुलाल आणि फटाक्याची आतषबाजी केली आणि पेढे वाटून आनंदही व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

त्यांचे समर्थक आणि निकटवर्तीयांनी सिध्दिविनायक मंदिरात जावून दर्शन घेतले आणि त्यांच्या कारकिर्दीला यश लाभो अशी प्रार्थना केली.

close