मी तरी संपेन किंवा काँग्रस तरी – राणेंचा प्रहार

December 12, 2008 6:32 AM0 commentsViews: 7

12 डिसेंबर, कणकवलीकाँग्रेसला थेट आव्हान देत नारायण राणेंनी कॉँग्रेसवर आणखी एक प्रहार केला आहे. एक तर मी तरी संपेन किंवा कँागेसला तरी संपवेन असा इशारा राणे यांनी कणकवलीच्या जाहीर सभेत दिलाय. येत्या हिवाळी अधिवेशनानंतर आपण आपली नवी दिशा जाहीर करू असही राणे या वेळी म्हणाले. काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर नारायण राणे यांची सिंधुदुर्गातली ही पहिलीत जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी विलासरावं देशमुखांवरही भरपुर तोंडसुख घेतलं.काँग्रेसच्या नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात झालेल्या बैठकी मध्ये दाऊदशी संबंधीत व्यक्ती हजर होती याची सीडी माझ्या जवळ आहे" असं ते म्हणाले. विशेष म्हणजे या सभेला राणेसमर्थक आमदार गणपत कदम आणि सुभाष बने हे गैरहजर होते. त्यातच काँग्रेस आणि शिवसेनेने राणे समर्थक आमदारांना आपापल्या पक्षात ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राणे यांची पुढची लढाई एकाकी राहण्याचीच चिन्हं आहेत. दरम्यान नारायण राणे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपली नवी दिशा जाहीर करणार आहेत.

close