अवेळी पावसामुळे कांदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

November 11, 2010 11:35 AM0 commentsViews: 40

11 नोव्हेंबर

दसर्‍यानंतरही पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने शेतातच कांदा पडला आहेत. त्यामुळे कांदा महागला आहे.

नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा सडलेला येतो. याच कांद्याचे भाव प्रती किलो 20 ते 25 रुपये आहे.

जुना कांदा 25 ते 30 रुपये किलोने एपीएमसी घाऊक बाजारात विकला जातो.

सिडको बाजारपेठेत आणखी चढ्या भावाने विकले जात आहेत. नवीन कांदा येईपर्यंत पुढील दोन महिने ग्राहकांना कांदा मात्र रडवणार आहे हे नक्की.

close