शेगावात शेतकर्‍यांचा रेल रोको आंदोलन

November 11, 2010 11:41 AM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्या शेतकर्‍यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या मेळाव्यादरम्यान शेतकर्‍यांनी रेल रोको आंदोलन केले.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान शरद जोशींनी मेळाव्यातील भाषण सुरू असताना अचानक रेल रोको आंदोलनाची हाक दिली.

त्यामुळे पोलिसांची पुरती तारांबळ उडाली. या मार्गावरील सर्व ट्रेन तब्बल चार तास शेतकर्‍यांनी अडवून ठेवल्या होत्या.

राज्यपालांकडून शेतकर्‍यांच्या मागण्यांवर गांभिर्यानं विचार केला जाईल अशा प्रकारचा फॅक्स आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात काही शेतकर्‍यानी वीजेच्या खांबावर चढून आत्महत्याही करण्याचाही प्रयत्न केला.

close