दोन्ही संघ हैदराबादमध्ये दाखल

November 10, 2010 3:31 PM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची दुसरी टेस्ट मॅच दोन दिवसांनी हैद्राबादला होणार आहे. या टेस्टसाठी दोन्ही टीम काल उशिरा हैद्राबादला दाखल झाल्या आहे.

हैद्राबाद शहराबाहेर नव्याने बांधण्यात आलेल्या उप्पल स्टेडिअममध्ये ही मॅच होणार आहे. आणि इथे होणारी ही पहिलीच टेस्ट आहे. त्यामुळे पिचविषयीची उत्सुकता सगळ्यांना आहे.

शिवाय 1988 नंतर हैद्राबाद शहरात एकही टेस्ट मॅच झालेली नाही. म्हणूनही इथले क्रिकेट फॅन्स या टेस्टची वाट बघत आहे.

close