आदर्श प्रकरणी काँग्रेसचा पलटवार

November 11, 2010 1:39 PM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी प्रकरणी अडचणीत सापडलेल्या काँग्रेस पक्षांने आता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीन गडकरीही आदर्श सोसायटीमध्ये लाभार्थी आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहेत.

नागपूरचे बिल्डर आणि नितीन गडकरी यांच्या जवळचे मानले जाणारे अजय संचेती यांचा ड्रायव्हर सुधाकर मडके याच्या नावावर आदर्श सोसायटीत एक फ्लॅट आहे.

आदर्श सोसायटीतल्या फ्लॅटसाठी सुधाकरने 60 लाख रुपये भरले. पण त्याचा महिन्याचा 8600 इतका पगार आहे.

आदर्श घोटाळ्यामुळं बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसचा हा पहिला पलटवार आहे. याला आता भाजप कसे उत्तर देणार ते लवकरच कळेल.

close