शपथविधी सोहळा संपन्न

November 11, 2010 2:09 PM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुपारी साडेचार वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनीही शपथ घेतली. काँग्रेसकडून मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कोणत्याही मंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा मंत्र्यांनी आज शपथ घेतली.

त्यात छगन भुजबळ, आर.आर. पाटील, जयंत पाटील, सुनिल तटकरे, लक्ष्मण ढोबळे, मनोहर नाईक, जयदत्त क्षीरसागर, गणेश नाईक, विजयकुमार गावित यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

close