कॉग्रेसच्या अपक्ष आमदारांचा घूमजाव

November 10, 2010 4:21 PM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर

कॉग्रेसच्या अपक्ष आमदारांनी आता घूमजाव केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नव्या सरकारला पाठींब्याच्या पत्रावर आम्ही स्वाक्षरी करणार नाही. असे अपक्षाचे नेते रवि राणा यांचे म्हणणं आहे.

अशोक चव्हाण यांना आमचे मतदासंघातील विकासकामाचे प्रश्न समजून घेतले होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे नवे मुख्यमंत्री आहे त्यांना आमची बाजू माहिती नाही आमचे प्रश्न माहिती नाही.

त्यामुळे जोपर्यंत ते आमचे प्रश्न मागण्या समजून घेत नाही तोपर्यंत पाठींब्याच्या पत्रावर आम्ही स्वाक्षरी करणार नाही असं अपक्ष आमदार रवि राणा यांनी म्हटले.

अपक्षांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशा मागण्या या आमदारांच्या आहे. आमच्याकडे एकुण 11 आमदार आहे असा दावा राणा यांनी केला आहे.

close