राष्ट्रवादीच्या राजकारणात अस्वस्थांची नवी फळी

November 10, 2010 6:12 PM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर

राष्ट्रवादीच्या राजकारणाने आज नवं वळण घेतले. शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातले नेते झाले.

पण राष्ट्रवादीत आता नाराज आणि अस्वस्थांची नवी फळी पक्षाअंतर्गतच उभी राहणार हे नक्की आहे.

अजित पवारांमागे 99 पैकी तब्बल 73 आमदार उभे राहिले. तेव्हा पक्षाला त्यांना नेता म्हणावचे लागले. भुजबळांनी अजितदादांचे नाव पुढे केले.

पण त्यांच्या राजकीय भवितव्याचं काय? हा प्रश्न समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. भुजबळ सध्या तरी आपले पत्ते खोलू इच्छित नाही.

आक्रमक मराठा आमदार हे अजित पवारांचे समर्थक आहेत. महाराष्ट्रभरातली अशी सगळ्या पक्षांमधली नेतेमंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अजित दादांच्या संपर्कात आहेत.

त्यामुळे अजितदादांना अस्वस्थ ठेवणे योग्य नाही असे पवारांना वाटले असावे. सध्या तरी अजितपवारांची बाजू भक्कम आहे. पण भुजबळ नाराज आहेत.

दादांचे जयंत पाटलांशी जमत नाही. विजयसिंग मोहिते पाटील तर एकटे पडले. आर. आर. पाटील अजित पवारांना नेते म्हणून स्वीकारतील असे कुणालाच वाटत नाही.

पक्षातल्या या मातब्बर नाराजांना एकत्र येऊ न देणे याची काळजी घेतच अजित पवारांना आपलं पद निभवावे लागेल.

close