अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार

November 11, 2010 9:18 AM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही निवडक मंत्र्यांचा शपथविधी आज संध्याकाळी पार पडणार आहे.

राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. बुधवारी रात्री उशीरा आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी 170 आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले.

संध्याकाळी होणार्‍या शपथविधी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत दिली.

तसेच या 10 जणांमध्ये मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज सकाळी अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली.

मधुकर पिचड हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे दहा नेते शपथ घेतील असे ठरवण्यात आले आहे.

राष्ट्रवादीची यादी

1) अजित पवार

2) छगन भुजबळ

3) आर.आर. पाटील

4) जयंत पाटील

5) सुनिल तटकरे

6) गणेश नाईक

7) लक्ष्मण ढोबळे

8) मनोहर नाईक

9) विजयकुमार गावित

10) जयदत्त क्षीरसागर

close