भुजबळांचा मंत्रीमंडळात समावेश नक्की !

November 11, 2010 9:45 AM0 commentsViews: 6

11 नोव्हेंबर

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

ही चर्चा थांबवण्यासाठी खुद्द अजित पवार पुढे आले.

उपमुख्यमंत्रीपद गेल्याने छगन भुजबळ नाराज नाहीत, असं स्वत: अजित पवारांनी स्पष्ट केले.

मंत्रीमंडळात भुजबळांचा समावेश नक्की झाला. पण त्यांच्याकडे कोणते खात देण्यात येईल याबाबत मात्र अजून काही माहिती देण्यात आलेली नाही.

नव्या मंत्रिमंडळातली भूमिका माहित नाही : भूजबळ

मंत्रिमंडळात माझी काय भूमिका असेल याबद्दल मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितले. पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.

close