सचिन वर्ल्ड कपचा ब्रँड ऍम्बेसेडर

November 11, 2010 3:35 PM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 2011 वर्ल्ड कपचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून घोषीत करण्यात आले आहे. 2011 सालचा वन-डे वर्ल्ड कप भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या तीन देशांत खेळवण्यात येणार आहे.

स्पर्धेनिमित्त होणार्‍या अनेक कार्यक्रमांसाठी सचिन यानिमित्त पुढाकार घेणार आहे. सचिन तेंडुलकर वन-डेमध्ये जगातला सर्वाेत्तम प्लेअर आहे. सचिनने 442 मॅचमध्ये 17 हजार 598 रन्स केले.

कारकिर्दीत सहा वर्ल्ड कप खेळणारा सचिन हा फक्त दुसरा क्रिकेटर आहे. याआधी पाकिस्तानच्या जावेद मियाँदादने सहा वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

सचिनच मत

'आयसीसी वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करणं खरंच सगळ्या क्रिकेटर्ससाठी मोठी घटना आहे. त्यामुळे 2011च्या वर्ल्ड कपमध्ये माझा सहभाग आहे हे मी माझं भाग्य समजतो.

त्यातच हा वर्ल्ड कप आपल्याच उपखंडात होत असल्यामुळे हा वर्ल्ड कप माझ्यासाठी अजुनच खास आहे… आणि त्यातच आयसीसीच्या अशा कार्यक्रमाचा हिस्सा बनणं खास आहे.

यामुळे टीम इंडिया होम ग्राऊंडवर वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. '- सचिन तेंडुलकर

close