भीती रिझल्टची

June 4, 2009 8:21 AM0 commentsViews: 10

4 जून रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यादिवासाच्या टॉक टाईमचा विषय होता भीती रिझल्टची. याविषयावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुराधा सोवनी यांनी मार्गदर्शन केलं. रिझल्ट लागण्याची वेळ जवळ आली की घरोघरी आणि खास करून दहावी बारावीच्या परीक्षेच्यावेळी चिंतायुक्त वातावरण असतं. आपल्या पालकांच्या अपेक्षांना, आपण केलेल्या अभ्यासाला आणि आपल्यासमोर असलेल्या आव्हानाला आपण खरे उतरू की नाही याची भीती मुलांना सतत वाटत असते. अशावेळी पालकांनी मुलांचा ताण ओळखून मुलांना विश्‍वासात घ्यावं त्यांच्याशी सुसंवाद ठेवावा. मुलांच्या मनाची तयारी करण्यासाठी पालकांचा खूप मोठा हात असतो. तसंच करिअर काऊन्सेलिंगचा पर्याय निवडावा, असा सल्ला यावेळी डॉ. अनुराधा सोवनी यांनी दिला. तसंच त्यांनी पालकांच्या आणि मुलांच्या प्रश्नांची उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केलं.

close