ए राजांवर कारवाई होणार?

November 11, 2010 4:48 PM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर

वादग्रस्त टेलेकॉम मंत्री ए राजा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव वाढत आहेत. द्रमुकचे राजा एक लाख 76 हजार कोटी रुपयांच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकले आहेत.

सीएजीच्या प्राथमिक अहवालात राजा दोषी आढळले आहे. पण ते द्रमुकचा दलित चेहरा असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायला करुणानिधी तयार नाही.

गेले दोन दिवस विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज याच एका मुद्द्यावरून बंद पाडले. त्यामुळे कोरियाहून परत आल्यानंतर पंतप्रधान राजांविषयीचा निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतात परतल्यानंतर ते करुणानिधींना विनंती करून राजांना हटवतील, असे सूत्रांनी सांगितले.

close