कुपोषण आणि मुलं

June 11, 2009 5:46 PM0 commentsViews: 183

11 जूनच्या 'टॉक टाईम'चा विषय होता कुपोषण आणि मुलं. याविषयावर बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी मार्गदर्शन केलं. साधारणपणे बाळ 6 महिन्यांपर्यंत बाळाचं पोषण आईच्या दुधावर होतं. पण त्यानंतर बाळाने बाहेरचा खाऊ खायला सुरुवात केल्यावर त्याची कुपोषणाला सुरुवात होते. बाळांचं कुपोषण न होण्यासाठी बाळाची आईचं दूध पिण्याची सवय कमी होत गेल्यावर त्याच्या आहारात गोडाच्या शि-यातलं प्रमाण वाढवत जायचं. घरात एक खाऊचा कोपरा तयार करायचा म्हणजे मुलंस्वतःहून न मागता खातील. त्या खाऊच्या कोपर्‍यात चणे, शेंगदाणे, भाजलेले तांदूळ असा पौष्टीक खाऊ ठेवायचा आणि तो मुलांच्या हाताला लागेल अशा रीतीने ठेवायचा, असे कुषोषण होऊ नये यासाठी घरगुती पण पौष्टिक खाऊचे उपाय डॉ. जोशी यांनी सांगितले. अति खाणं हेही पुष्कळदा मुलांच्या पोषणास कारणीभूत ठरतं. अंगाने बारीक मुलांच्या आहारात सोयाबीन तेलाचा समावेश करा. त्यांची तेलाने मालीश करायची. मुलांच्या आहारात दूध, फळ, भाज्या यांचा समावेश करा. तसंच मुलांच्या वाढीसाठी त्यांना भरपूर खेळायला ही द्या, असं डॉ. हेमंत जोशी यांनी सांगीतलं.

close