सुदर्शन यांची सोनियांवर टिका

November 11, 2010 4:53 PM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर

भगव्या दहशतवादाच्या मुद्द्यावरून संघ आणि काँग्रेस आमने सामने उभे असतानाच आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

माजी सरसंघचालक के सुदर्शन यांनी काल भोपाळमध्ये सोनिया गांधींवर वैयक्तिक टीका केल्यानंतर आज देशात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली.

सोनिया गांधी या सीआयएच्या एजंट आहेत आणि त्यांनीच राजीव गांधी आणि इंदिरा गांधींची हत्या घडवून आणली.असा सनसनाटी आरोप काल सुदर्शन यांनी केला होता.

हे सुदर्शन यांचे वैयक्तिक मत असून संघाची भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केले.

close