नकार स्वीकारताना…

June 8, 2009 6:06 PM0 commentsViews: 131

8 जूनच्या टॉक टाईमचा विषय होता नकार स्वीकारताना. याविषयावर विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं. लग्न जुळवण्याच्या वेळी जोडीदार शोधताना कित्येकदा नकार द्यावा लागतो किंवा नकार स्वीकारावा लागण्याची वेळ येते. लग्न जुळवताना सर्वात आधी स्वतःचं परीक्षण करावं. कायम आपल्या जोडीदारीबद्दलच्या असलेल्या संकल्पना स्पष्ट असाव्यात, असं विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी म्हणाल्या. एकमेकांची मूल्यं विसंगत असल्यास किंवा आर्थिक तसंच सामाजिक तफावत असल्यास नकार देताना माणुसकीला धरून समोरच्याला न दुखवता योग्य पद्धतीने सुस्पष्टपणे नकार द्यावा, असंही त्या म्हणाल्या. आपल्या नकाराने समोरच्याचा आत्मविश्‍वास कमी होणार नाही याचीही काळजी घ्यावी. तसंच पालकांनी मुलांना सल्ला द्यावा. पण मुलांवर कुठल्याही प्रकारचं दडपण आणू नये. लग्न हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग आहे. यामुळे पुढे पश्चात्ताप करण्यापेक्षा जोडीदार निवडताना विचार पूर्वक निर्णय घ्या, असं विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी यांनी सांगितलं.

close