सुरक्षित रक्तदान

June 15, 2009 12:44 PM0 commentsViews: 160

15 जूनच्या 'टॉक टाईम'चा विषय होता सुरक्षित रक्तदान. या विषयावर बोलण्यासाठी ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. प्रीत वलेचा आल्या होत्या. रक्तदान हे श्रेष्ठदान समजलं जातं. पण या रक्तदानाविषयी लोकांचे अनेक गैरसमज आहेत. 18 ते 60 वर्षांची कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. यासाठी व्यक्तीचं वजन 45 किलो असणं आवश्यक आहे. रक्तदान करण्यासाठी रक्तातल्या हिमोग्लोबीनचं प्रमाणही महत्त्वाचं मानलं जातं. रक्तदानासाठी हिमोग्लोबीनचं प्रमाण साधारणपणे 12.5 असायलाच हवं. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी असल्याने त्यांच्यातलं रक्तदानाचं प्रमाण हे कमी असतं. दर 3 महिन्यांनी रक्तदान करता येऊ शकतं. कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी, अपघात तसंच बाळंतपणाच्या वेळी रक्ताची गरज लागते. अशावेळी योग्य रक्तगटाचं रक्त मिळाल्यास रोग्याचा प्राण वाचू शकतो. या सारखी महत्त्वपूर्ण माहिती डॉ. प्रीत वलेचा यांनी 'टॉक टाईम'मध्ये दिली.

close