भारतीय टीमनं पाक दौरा करू नये- क्रीडामंत्री गिल

December 12, 2008 10:23 AM0 commentsViews: 5

12 डिसेंबर, नवी दिल्ली भारतीय क्रिकेट टीमनं सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचा दौरा करु नये, असं क्रीडामंत्री एम. एस. गिल यांनी आज स्पष्टपणे म्हटलंय. भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीचा सर्रास वापर होत असताना आपली क्रिकेट टीम पाकिस्तानात पाठवू नये, असं त्यांनी आज दिल्लीत पत्रकांरांशी बोलताना म्हटलंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट्ट आज भारतात आले आहेत. आज चेन्नईत आयसीसीचे सीइओ हरुन लोगार्ट आणि बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना भेटून दौरा ठरल्याप्रमाणे व्हावा, यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर गिल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गिल यांच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही पत्रकांरांशी संवाद साधला. केंद्र सरकारने परवानगी दिली नाही तर दौरा होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

close