महाराष्ट्रात सरकार स्थापन तर दिल्लीत ‘लॉबिंग’

November 11, 2010 5:39 PM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी शपथ घेतली. पण काँग्रेसच्यावतीने आज एकाही मंत्र्यांने शपथ घेतली नाही.

त्यामुळे स्वच्छ चारित्र्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची जत्रा दिल्लीत भरली आहेत.

हायकमांडच्या मर्जीने सगळे काही होते. दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण राज्यात आले पण आपल्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यावे, कुणाला घेऊ नये हेही पक्षश्रेष्ठीच ठरवणार आहेत.

स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे ठरवले, तर मग काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहेत. त्यामुळेच मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेकांची चलबिचल वाढली आहे.

शपथविधीचा कार्यक्रम पार पडत नाही तोच अनेक मातब्बर नेत्यांनी दिल्ली कुच केली आहे. पुढचे तीन दिवस दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांचा राबता असणार आहे.

जो तो आपापल्या गॉडफादरला गाठून लॉबिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. केवळ मंत्रिपदच नाही, तर आवडतं खातं मिळवण्यासाठी सुद्धा मोठी लॉबिंग केले जात असते.

अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाणांच्या मर्जीने अनेकांची वर्णी लागली होती. त्यांना यावेळी डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर काही नव्या चेहर्‍यांना संधी मिळवून देण्याचा प्रयत्न खुद्द पृथ्वीराज चव्हाण करणार आहेत.

त्यामुळे इच्छुकांची मांदियाळी पृथ्वीराज चव्हाणांच्या दरबारी दाखल झाल्याचे चित्र पाह्यला मिळणार आहे.

गृहखात्यावर नजर

आर.आर.पाटीलछगन भुजबळजयंत पाटील

महसूल खातं कोणाकडे?

नारायण राणेपतंगराव कदम

पत्ता कापला जाणार?

राधाकृष्ण विखे-पाटीलसुभाष झनकअब्दुल सत्तारनसीम खानरणजित कांबळेनितीन राऊत

नव्या चेहर्‍यांना संधी?

अमित देशमुखप्रणिती शिंदेवर्षा गायकवाडयशोमती ठाकूर

close