कल्याण -डोंबिवलीवर युतीचा झेंडा

November 12, 2010 9:06 AM0 commentsViews: 6

12 नोव्हेंबर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या वैजयंती घोलप यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर भाजपचे बुधाराम सरनोबत यांची निवड झाली.

त्यांच्या विरोधी उमेदवार उषा वाळूंज यांनी माघार घेतल्याने घोलप यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली होती.

या निवडणुकीतयुतीचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

मनसे आणि राष्ट्रवादी या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याने अपक्ष नगरसेवकाने फॉर्म भरुनदेखील शिवसेनेच्या गळ्यातच महापौरपदाची माळ पडणार असे मानले गेले.

सकाळी अकरा वाजता होणार्‍या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने महापौरांची निवड केली.

यात शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी वैजयंती घोलप आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे बुधराम सरनोबत यांना उमेदवारी देण्यात आली.

शिवसेनेच्या वैजयंती घोलप यांचं महापौरपदाच्या लढतीत पारडं जड होते.

घोलप सलग 4 थ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करू असे त्यांनी स्पष्ट केले.

close