गंगोत्रीच्या शोधात… (भाग – 2)

June 18, 2009 1:24 PM0 commentsViews: 6

5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने 6 जूनचा रिपोर्ताज हा पर्यावरणावर आधारित होता. गंगोत्रीच्या शोधात या रिपोर्ताजमध्ये हिमालयातल्या हिमनद्यांवर ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम होत आहे, याचा शास्त्रीय आढावा घेण्यात आला. तो आढावा घेतला शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश राव, ग्लेसिओलॉजिस्ट राजेश कुमार, प्रसिद्ध साधू, गिर्यारोहक आणि उत्तम फोटोग्राफर स्वामी सुरेन्द्र नाथ यांनी. ग्लेशियर म्हणजे हिमनदी. ती पृथ्वीला लागणार्‍या पिण्याच्या पाण्याची फॅक्टरी आहे. पण सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या या झपाट्याने वितळत आहेत. याचाच मोठा धोका निर्माण होत आहे. ते कसं हे जाणून घ्यायचं असेल तर ' गंगोत्रीच्या शोधात ' हा रिपोर्ताज पहा.

close