सुदर्शन यांच्या विधानावरुन अकोल्यात निदर्शन

November 12, 2010 2:03 PM0 commentsViews: 6

12 नोव्हेंबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सी. सुदर्शन यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांच्यावर टिका केली.

या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज अकोल्यात निदर्शनं केली.

सुदर्शन यांनी माफी मागावी अशी मागणी करत जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा आरएसएस च्या कार्यालयाकडे वळवला आणि तिथे पुतळ्यांचे दहन केले.

हा पुतळा विजवण्याचा प्रयत्न पोलीस करत असताना एका पोलीस कर्मचा-यांचा हात भाजला.

close