‘आदर्श’ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

November 12, 2010 2:05 PM0 commentsViews: 1

12 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीचे बांधकाम अनधिकृत असल्याने ही बिल्डिंग का पाडण्यात येऊ नये अशाप्रकारची विचारणा करणारी नोटीस केंद्रीय पर्यावरण विभागाने आदर्श सोसाटीला बजावली.

घोटाळ्याच्या वादात सापडलेल्या आदर्श सोसायटीवर कडक कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिले. रमेश यांनी सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली.

आणि नियम धाब्यावर बसवून बांधलेली सोसायटी का पाडण्यात येऊ नये, अशी विचारणा ही केली.

त्याचबरोबर देशातल्या कोणत्याच शहरातल्या बेकायदेशीर बांधकामाला अभय मिळणार नसल्याचा कडक इशारा त्यांनी दिला.

close